योगगुरू रामदेव बाबा यांचा पंतजली हा भारतातील एक मोठा ब्रँड आहे. पंतजली चे बरेच प्रॉडक्ट्स आजपर्यंत वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. सध्या योगगुरु बाबा रामदेव यांच्या पतंजली ग्रुपच्या 5 औषधांच्या उत्पादनावर बंदी घातली आहे. उत्तराखंड आयुर्वेद व युनानी परवाना प्राधिकरणाने ही कारवाई केली आहे.
इंस्टाग्राम रिल्स मधूम ‘असे’ कमवा पैसे! मेटा कडून नवीन प्रोग्राम जाहीर
पतंजली च्या काही उत्पादकांच्या ( products) जाहिराती या ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या असल्याचा आरोप करत, उत्तराखंड आयुर्वेद व युनानी परवाना प्राधिकरणाने हा निर्णय घेतला आहे. यामध्ये बीपीग्रीट, मधुग्रीट, थायरोग्रीट, लिपिडोम टॅबलेट, आयग्रीट गोल्ड टॅब्लेट्स या औषधांचा समावेश आहे.
बिग ब्रेकिंग! “तुझ्यात जीव रंगला” फेम अभिनेत्री कल्याणीचा अपघाती मृत्यू
या पाच औषधांचा उपयोग मधुमेह व रक्तदाब या आजारांवरील उपचारासाठी होत होता. मात्र, केरळचे के व्ही बाबू या डॉक्टरांनी पतंजलीच्या या औषधांविरोधात तक्रार केली होती, यामुळे प्राधिकरणाकडून औषधांची तपासणी केली. यानंतर या औषधांवर कारवाई करण्यात आली आहे.
सहलीवरून येणाऱ्या बसचा अपघात; 10 जण जखमी
या दरम्यान योगगुरू रामदेव बाबा व पतंजली समूहाने ( Patanjali Group) ही कारवाई चुकीची असल्याचा आरोप केला आहे. तसेच आयुर्वेदाला विरोध करण्यासाठी ही कारवाई केली असल्याचे देखील सांगितले आहे. या औषधांच्या उत्पादनासाठी आता पतंजलीला प्राधिकरणाकडून परवानगी घ्यावी लागणार आहे.
मुस्लिम तरुणांनी केली हिंदू तरुणाला मारहाण! सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल