NCP । शरद पवार गटाला मोठा दणका! केंद्रीय पातळीवर अजित पवार गटाची वाढली ताकद

Big blow to Sharad Pawar group! The power of Ajit Pawar group increased at the central level

NCP । मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरद पवार (Sharad Pawar) गट आणि अजित पवार (Ajit Pawar) गट असे दोन गट पडले आहेत. त्यामुळे राज्याचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. या दोन्ही गटांनी पक्षाच्या चिन्हावर आणि पक्षावर दावा केला आहे. हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे (Election Commission) प्रलंबित आहे. निवडणूक आयोग कोणाच्या बाजूने निकाल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यापूर्वी एक मोठी बातमी समोर आली आहे. (Latest Marathi News)

Kerala Accident । भीषण अपघात! स्कूल बसची रिक्षाला धडक, चार महिलांसह ५ जणांचा मृत्यू

“नागालँडचे (Nagaland) आमचे प्रदेशाध्यक्ष आणि सर्व सदस्यांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे. त्यांनी अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे”, असे सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी सांगितले आहे. त्यामुळे शरद पवार गटाला मोठा दणका बसला आहे. तसेच पक्षाचे खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी देखील सविस्तर भूमिका मांडली आहे.

BJP । निवडणुकांपूर्वीच भाजपला मोठा धक्का! सर्वात मोठा पक्ष एनडीएतून बाहेर

“नागालँडच्या सर्व सहकाऱ्यांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे. त्याबाबत त्यांनी तसे एफीडेव्हीट दिले आहेत. आमच्या पक्षाची राष्ट्रीय मान्यता काढली असली तरी आमचा पक्ष नागालँडमध्ये आणि महाराष्ट्रात आहे. आम्ही ज्या दिवशी एनडीएत सहभागी झालो त्याच दिवशी आम्ही त्याबाबत नागालँड युनिटला पत्र दिले होते, असे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले आहे.

IND vs AUS । केएल राहुलला वाटते या गोलंदाजाची सर्वात जास्त भीती, म्हणाला; “या गोलंदाजाला खेळणं ..”

“सध्या राज्यात एकनाथ शिंदे प्रकरण सुरु असून आमचे प्रकरण आणि त्यांचे प्रकरण वेगळे आहे. आम्ही सर्व निर्णय कायदेशीर बाबींचा अभ्यास करुन घेतला आहे. एकनाथ शिंदे यांच्या केसचा काय निर्णय होईल हे मला माहित नाही आणि मला त्यावर काही बोलायचे नाही”, अशी प्रतिक्रिया प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे.

Accident News । बसचा अतिशय भीषण अपघात! चालकाचे नियंत्रण सुटून बस थेट पुलात कोसळली; २५ प्रवाशी जखमी

Spread the love