Site icon e लोकहित | Marathi News

ठाकरे गटाला मोठा धक्का; जवळच्या विश्वासू व निष्ठावान कार्यकर्त्याने केला शिंदे गटात प्रवेश!

Big blow to Thackeray group; A close trusted and loyal activist joined the Shinde group!

काही महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदेंनी ( Eknath Shinde) शिवसेनेत बंड केले. यावेळी झालेल्या राजकीय भूकंपाच्या हादऱ्यांनी उद्धव ठाकरेंना पुरते डळमळीत केले आहे. आपल्याच पक्षातून फुटलेले आमदार, हातातून गेलेली सत्ता यानंतर स्वतःच्याच वडिलांनी उभारलेल्या संघटनेवर कोणी दुसऱ्यानेच दाखवलेला हक्क यामुळे उद्धव ठाकरेंची चांगलीच कोंडी झाली आहे.

समुद्र किनाऱ्यावर घडली धक्कादायक घटना; सहलीला गेलेले चार विद्यार्थी बुडाले

दरम्यान ठाकरेंना त्रास देणारी आणखी एक गोष्ट म्हणजे ठाकरे गटाला लागलेली गळती! एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केल्यापासून ठाकरे गटातील अनेक नेते हळूहळू शिंदे गटात प्रवेश करत आहेत. यामध्ये अनेक विश्वासू व निष्ठावान लोकांनी ठाकरेंची साथ सोडली.

गौतमी पाटीलचा बेडरुममधील ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पाहा व्हिडीओ

अशातच ठाकरे गटाला ( Thackeray Group) धक्का देणारी आणखी एक माहिती समोर येत आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्या जवळचे समजले जाणारे सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी ठाकरेंची साथ सोडली आहे. नुकताच त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

“हिंदूंच्या घरामध्ये जर दोन मुल असतील तर त्यातील एकाला…” बागेश्वर बाबांचे मोठे वक्तव्य

भूषण देसाई ( Bhushan Desai) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेब भवनात शिवसेनेत ( शिंदे गट) प्रवेश केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे भूषण देसाई यांच्यासोबत काही कार्यकर्त्यांनी देखील यावेळी पक्षांतर केले आहे. या घटनेने देसाई कुटुंबात फूट पडली आहे.

आदित्य ठाकरेंची फडणवीसांवर जोरदार टीका; म्हणाले, “समोर आलेल्या भ्रष्टाचारावर…”

Spread the love
Exit mobile version