नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकांमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. यावेळी राज्यातील प्रमुख राजकीय पक्षात चढाओढ पहायला मिळाली. दरम्यान शिवसेनेच्या ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात देखील चांगलीच स्पर्धा लागली होती. यामध्ये शिंदे गटाने बाजी मारली. अशातच ठाकरे गटातील एका महत्त्वाच्या नेत्याने शिंदे गटात प्रवेश करण्याचे निश्चित केल्याने ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला आहे.
ब्रेकिंग! उर्फी जावेदला धमकी देणारा आरोपी अटकेत
संजय राऊत यांचे निकटवर्तीय व शिवसेना नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख भाऊ चौधरी ( Bhau Chaudhari) हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांच्या शिंदे गटात प्रवेश करत आहेत. याबाबत माहिती मिळताच उद्धव ठाकरे यांच्याकडून भाऊ चौधरी यांना संपर्क पदावरून हटवण्यात येत आहे. याबाबतची माहिती खुद्द संजय राऊत यांनी ट्विट करत दिली आहे.
गौतमी पाटीलचे कार्यक्रम महाराष्ट्रात बंद होणार? अनेक संघटनांकडून होतीये मागणी
भाऊ चौधरी हे संजय राऊत यांचे फार जवळचे व्यक्ती समजले जात होते. कोणताही कार्यक्रम अथवा प्रवास असो ते कायम संजय राऊत यांच्या सोबत असायचे. शिवसेनेमधील अधिकारी यापेक्षा संजय राऊत यांचे कट्टर समर्थक अशी भाऊ चौधरी यांची ओळख होती. इतकच नाही तर पत्राचाळ प्रकरणी अटकेत असणाऱ्या संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर साक्षीदार म्हणून भाऊ चौधरी यांनीच सही केली होती. इतका जवळचा माणूस पक्ष सोडून गेल्याने नक्कीच ठाकरे गटाला धक्का बसला आहे.
कोयता गँगची दहशत मोडीत काढा; अजित पवारांचे ट्विट चर्चेत, अधिवेशनात देखील प्रश्न उपस्थित केला