Maharashtra Politics । मुंबई : लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला (Uddhav Balasaheb Thackeray Group) पुन्हा एकदा खूप मोठा धक्का बसला आहे. कारण एका बड्या नेत्याने शिंदे गटात प्रवेश केला आहे. अपमान गळचेपी आणि मानसिक खच्चीकरण झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ठाकरे गटासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. याचा परिणाम आगामी निवडणुकीत होऊ शकतो. (Latest marathi news)
Manoj Jarange । बिग ब्रेकिंग! मनोज जरांगे पाटलांची मोठी घोषणा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत ठाकरे गटाच्या पूर्व विदर्भ महिला संपर्क संघटक आणि प्रवक्त्या प्रा. शिल्पा बोडखे (Shilpa Bodkhe) यांनी आज शिवसेनेमध्ये (Shivsena) प्रवेश केला आहे. शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी हा पक्षप्रवेश संपन्न झाला. दरम्यान, विदर्भात त्या शिवसेना वाढवण्याचे सर्वसामान्य पोहचवण्याचे काम शिल्पा बोडखे आपल्या पूर्ण क्षमतेने प्रामाणिकपणे करत होत्या. पण ठाकरे गटात त्यांचा अपमान होत असल्याने त्यांनी काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाला रामराम ठोकला होता.
Viral Video । ट्रेनमध्ये पैसे न दिल्याने किन्नरांनी केली लोकांना मारहाण; धक्कादायक व्हिडीओ समोर
आज त्यांनी शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश करत आपली पुढील राजकीय वाटचाल स्पष्ट केली आहे. शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करत बोडखे यांनी यापुढेही प्रामाणिकपणे पक्षाचे काम करावे आणि राज्य सरकारचे काम तसेच पक्षाचे विचार विदर्भातील सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचवावेत अशी आशा व्यक्त केली आहे.
Ketki Chitle । मनोज जरांगेंचे फडणवीसांवर आरोप; केतकी चितळे म्हणाली, “एका मोर्चा धारक…”