एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी केली आणि भाजपसोबत युती करून राज्यात नवीन सरकार स्थापन केले. नंतर ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट पडले. यांनतर ठाकरे गटाला चांगलीच गळती लागली. अनेक नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला. आगामी निवडणुकीच्या दृष्टीकोनातुन राज्यातील राजकीय पक्षात मोठ्या हालचाली सुरू असल्याचे दिसत आहे. यामध्येच आता उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे.
Ambani House Visit | फक्त २ रुपयात अंबानींचे घर पाहण्याची सुवर्णसंधी; कसं ते जाणून घ्या
ठाकरे गटाच्या दोन माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे. या नगरसेवकांनी आपल्या शेकडो समर्थकांसह शिंदे गटात प्रवेश केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शिंदे गटात प्रवेश केला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, कांदिवली बीएमसी प्रभाग क्रमांक 28 चे नगरसेवक एकनाथ हुंडारे आणि मढचे माजी नगरसेवक गणेश भंडारी यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंसाठी हा आणखी एक मोठा धक्का मानला जातोय.