बिग ब्रेकिंग! महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल

Big Breaking! A case has been registered against Jitendra Awada for molesting a woman

ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुरु असलेला हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडला होता व प्रेक्षकांना मारहाण केली याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. दरम्यान, आता पुन्हा एकदा त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका 40 वर्षीय महिलेच्या विनयभंगाचे प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी आव्हाडांविरुद्ध कलम 354 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धक्कादायक! पती आवडत नाही म्हणून पत्नीने केला खून; गळा दाबून टाकले मारून

दरम्यान, काल कळवा आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या कळवा-खाडी पुलाचे उद्घाटन झाले. यावेळी शिंदे, श्रीकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड हे यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान एका महिलेने आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विनयभंग केल्याचा आरोप केला आहे. यामुळे ते पुन्हा एकदा नवीन वादात सापडले आहेत.

‘मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतोय’; जितेंद्र आव्हाडांचे ट्विट चर्चेत

जितेंद्र आव्हाड यांच्या दोन गुन्हे दाखल झाल्यानंतर त्यांनी एक ट्विट देखील केले आहे. ट्विट करत त्यांनी लिहिले की, “पोलीसांनी माझ्या विरुद्ध ७२ तासात २ खोटा गुन्हा दाखल केला आणि तोही ३५४ ,., मी ह्या पोलिसी आत्याचारा विरुद्ध लढणार … मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे,,. लोकशाहीची हत्या .. उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत”.

कुत्र चावलं तर मालकाला भरावा लागणार १० हजार रुपये दंड; वाचा सविस्तर

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *