बिग ब्रेकिंग! किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल

Big Breaking! A case has been registered against Kishori Pednekar

‘एसआरए’प्रकरणी मुंबईमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वांद्रे येथील निर्मल नगर पोलिस ठाण्यामध्ये किशोरी पेडणेकर आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात गुन्ह्याची नोंद झाली आहे.

“आम्हीही राजकारणामध्ये कुस्ती करतो, पण…” देवेंद्र फडणवीसांच वक्तव्य चर्चेत

याबाबत किरीट सोमय्या यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. किरीट सोमय्या यांनी ट्विट करत लिहिले की, “मुंबई पोलीस निर्मल नगर वांद्रे पूर्व पोलीस ठाण्यात किशोरी पेडणेकर कुटुंब आणि किश कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड विरुद्ध गोमाता जनता एसआरए वरळी मुंबई येथे फसवणूक केल्याप्रकरणी एफआयआर दाखल केला आहे.”

मोठी बातमी! शिवराज राक्षे ठरला ‘महाराष्ट्र केसरी’चा मानकरी

पुनर्वसन योजनेंतर्गत झालेल्या फसवणूक आणि बनावट कागदपत्रांच्या प्रकरणामध्ये मागच्या काही दिवसांपूर्वी पेडणेकर यांची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर मुंबई महापालिकेकडून कारवाई देखील झाली. किशोरी पेडणेकर यांचे वरळीमधील गोमाता नगरमधील कार्यालय आणि घर डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सील करण्यात आले होते. दरम्यान आता पेडणेकरांसाठी हा खूप मोठा धक्का समजला जात आहे.

महाराष्ट्र केसरी जिंकताच शेतकरीपुत्र शिवराजसाठी समोर आली मोठी गुडन्यूज

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *