पुण्यातील (Pune) नवले ब्रिज येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामध्ये कंटेनरने जवळपास २६ गाडयांना उडविले असून त्यामध्ये ६ ते १० जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
ओबीसी आरक्षण वाढवण्याची मागणी; प्रकाश आंबेडकरांकडून आंदोलनाचा इशारा
कंटेनरचा ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले त्यामुळे हा भीषण अपघात घडला आहे. दरम्यान हा अपघात रात्री नऊच्या सुमारास झाला. अपघातावेळी रस्त्यावर जास्त प्रमाणात ऑइल सांडल्याने रस्ता अधिकच निसरडा झाला त्यामुळे गाड्यांची संख्या देखील अधिकाधिक वाढत गेली.
बिबट्याने मानवी वस्तीत घातला धुमाकूळ; वाचा सविस्तर बातमी
दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दलाच्या गाड्या, १० ते १५ रुग्णवाहिका देखील अपघातस्थळी आल्या. अपघात इतका भीषण होता की जवळपास २६ गाड्या एकमेकांवर आदळल्या. कंटेनर हा साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जात होता त्यामुळे वाहनांच्या दोन ते तीन किलोमीटरच्या रांगा लागल्या असून वाहतूक कोंडीही झालेली आहे.
भगतसिंग कोश्यारींचे धोतर फेडणाऱ्यास किंवा फाडणाऱ्यास १ लाखांचं बक्षीस; राष्ट्रवादी आक्रमक