मागच्या वर्षी पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला (Punjabi singer Sidhu Musewala) यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणामध्ये पोलिसांनी ३ आरोपींना ताब्यात घेतले होते. हे आरोपी पंजाबमधील गोइंदवाल कारागृहात आहेत. दरम्यान हे आरोपी सध्या जेलमध्ये असून या ठिकाणी देखील त्यांच्यामध्ये हाणामारी झाली आहे.
पुण्यात जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी हटके संकल्पना; मतदान करणाऱ्यांना मोफत चहा व पुस्तक वाटप
सूत्रांच्या माहितीनुसार, मनदीप तुफान, मनमोहन आणि केशव अशी या गुंडांची नावे असून यांच्यामध्ये रविवारी संध्याकाळी जोरदार चकमक झाली. यामध्ये मनदीप आणि मनमोहन ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर तिसरा गुंड केशव गंभीर जखमी झाला आहे.
एसी खरेदी करताना ‘या’ ५ गोष्टींचा विचार करा, नाहीतर होईल पच्छाताप
सध्या जखमी झालेला गुंड केशव याला उपचारासाठी रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. यामध्ये दोन गुंडांचा मृत्यू झाला असल्याची माहिती डीएसपी जसपाल सिंह ढिल्लन यांनी दिली आहे.
धक्कादायक घटना! डीजेवर नाचता नाचता खाली कोसळला, अन् १८ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला