सध्या एक धक्कदायक माहिती समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री तबस्सुम गोविल (Tabassum Govil) यांचे निधन झाले आहे. तबस्सुम यांना शुक्रवारी हृदयविकाराचा झटका आला होता त्यांनतर त्यांना रुग्णालयात देखील दाखल करण्यात आले, पण अखेर त्यांनी वयाच्या ७८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी अनेक चित्रपटात आणि टीव्ही शोमध्ये (TV show) सहभाग नोंदवला होता.
एका व्यक्तीला ऑनलाईन हॉटेल बुक करण पडलं महागात; पाहा नेमकं काय आहे प्रकरण?
शुक्रवारी रात्री त्यांना दोनवेळा हृदयविकाराचे (Heart disease) झाकते आले त्यानंतर त्यांना लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण रुग्णालयात दाखल करतच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. आज मुंबई या ठिकाणी त्यांच्यावर अंतिम संस्कार होणार आहेत. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांचा मुलगा म्हणाला की, आईची इच्छा होती की अंत्यसंस्काराआधी तिच्या मृत्यूबद्दल सांगू नये.
अहमदनगर शहरातील उड्डाणपुलाचा केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थित लोकार्पण सोहळा संपन्न
दरम्यान, तबस्सुम यांची ओळख फक्त अभिनेत्री म्हणून नव्हती तर त्यांनी एक ‘टॉक शो’देखील होस्ट केला होता. ‘फूल खिले हैं गुलशन गुलशन’ (Phool Khile Hain Gulshan Gulshan) हा शो त्यांनी होस्ट केला होता.
एका चित्रपट दिग्दर्शकाने केली मोठी घोषणा! श्रद्धा वालकर हत्याकांडावर चित्रपट बनवणार..