गेली अनेक वर्षांपासून ग्लायफोसेटचा (glyphosate) वापर केला जात होता. परंतु सरकारने आता या तणनाशकावर (herbicides) बंदी घातली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना (Farmers) आता ग्लायफोसेट या तणनाशकाचा वापर करता येणार नाही. खरतर सरकारने गेल्या अनेक वर्षांपासून ग्लायफोसेटवर बंदी (ban) आणण्याचं ठरवलं होत. 2020 मध्ये तणनाशकावर बंदी घातली होती. परंतु केंद्र सरकारने (Central government) ग्लायफोसेटच्या घटकाकडून बंधने घालण्यासाठी सूचना मागवल्या होत्या. दरम्यान, यापूर्वीच तेलंगणा आणि केरळने ग्लायफोसेटवर बंदी घातली होती.
परतीच्या पावसाचा तमाशा फडांना बसला जोरदार फटका; ‘या’ ठिकाणचे तमाशे तात्पुरते बंद
दरम्यान नुकतच केंद्रीय कृषी मंत्रालयाने (Agriculture Department) प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, आता कोणत्याच शेतकऱ्याला ग्लायफोसेटचा वापर करता येणार नाही. इतकंच नाही तर व्यावसायिक कीटक नियंत्रक शिवाय कुणालाही तणनाशकाचा वापर करता येणार नाही. तसेच केंद्रीय कृषी मंत्रालयाने ग्लायफोसेटसाठी देण्यात आलेले नोंदणी प्रमाण नोंदणी समितीकडे परत करायला सांगितले.
उर्फी जावेदला मागे टाकत बहिण डॉली जावेदने परिधान केला ‘असा’ ड्रेस; हॉट लूक पाहून चाहते झाले घायाळ
इतकंच नाही तर प्रमाणपत्रधारकांना आता प्रमाणपत्रावर मोठ्या अक्षरात व्यावसायिक कीटक नियंत्रकामार्फत ग्लायफोसेट फॉर्म्युलेशनच्या वापरास परवानगी आहे, असा संदेश लिहून देण्यात येणार आहे. दरम्यान सरकारच्या या निर्णयाविषयी नाराजी व्यक्त केली जातेय. महत्वाची बाब म्हणजे तणनाशकाने जमीन आणि आरोग्याबाबत दुष्परिणाम होतात. तसेच मनुष्यबळ देखील कमी लागते. त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च देखील कमी होतो.
कापसाला किमान 12 हजार रुपयांचा हमीभाव द्या; शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी
का येतेय ग्लायफोसेटवर बंदी?
2018 मध्ये अमेरिकेत ग्लायफोसेटवर बंदी घातली. दरम्यान यावेळी मोन्सॅन्टोया या कंपनीनं त्या शेतकऱ्याला 289 दशलक्ष अमेरिकी डॉलर द्यावेत असा न्यायालयीन आदेश होता. याप्रकरणी शेतकऱ्याचा दावा घेत कॅलिफोर्नियात हा निकाल दिला. ड्वेन जॉन्सन हे 46 वर्षांचे असताना कीड नियंत्रक म्हणून काम करत होते. त्यांनी 30 वेळा तणनाशकाचा राऊंडअप केल्यानं त्यांना कॅन्सर झाल्याचं सांगितलं गेलं. याच कारणामुळे ग्लायफोसेट हे तणनाशक बंद केल्याचे समजते.
धक्कादायक! गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन ३० जण होरपळले, तर १० जण गंभीर जखमी; वाचा सविस्तर