मागील काही दिवसांत पुण्यात कसबा चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचे वारे वाहत आहे. भाजप व महाविकास आघाडीसाठी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची होती. दोन्ही पक्षांनी निवडणूक जिंकण्यासाठी चांगलीच फिल्डिंग लावली होती. दरम्यान या निवडणुकीचा आज निकाल लागला असून चिंचवड मतदारसंघात भाजपच्या अश्विनी जगताप विजयी झाल्या आहेत.
यामध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांचा पराभव झाला आहे. मात्र भाजपच्या अश्विनी जगताप यांनी ३६ हजार ७० मतांनी नाना काटे यांचा पराभव केला आहे.
मोठी बातमी! नागालँडमध्ये देखील राष्ट्रवादीचाच डंका
चिंचवड मतदारसंघात भाजपच्या अश्विनी जगताप व काँग्रेसचे नाना काटे व अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यात तिहेरी लढत होती. मात्र यामध्ये अश्विनी जगताप यांनी बाजी मारली आहे. अश्विनी जगताप या दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आहेत. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना आमदारकीचे तिकीट देऊन भाजपने भावनिक चाल खेळली होती. ही चाल अखेर यशस्वी झाली आहे.