पत्रकार शशिकांत वारीसे (Shashikant Warise) यांच्या हत्येचा मुद्दा उचलाल तर तुमचाही शशिकांत वारीसे करु, अशी धमकी संजय राऊत यांना देण्यात आली आहे. याबाबत स्वतः संजय राऊत यांना माहिती दिली आहे. याबाबत राऊतांना धमकीचे फोन देखील आले आहेत.
महिलांच्या हाती कोयता पुणे असुरक्षित झाले का? वसंत मोरेंची ‘ती’ पोस्ट चर्चेत
रत्नागिरीमधील पत्रकार शशिकांत शंकर वारीशे यांचा सोमवारी (दि.6) अपघात झाला होता. या अपघातात (Accident) ते गंभीर जखमी झाले होते. दरम्यान कोल्हापूर (Kolhapur) येथील रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला. बाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली. रिफायनरी समर्थकांविरोधात बातमी दिल्याने हा अपघात घडवून आणल्याचे सांगितले जात आहे. यांनतर या घटनेला संजय राऊतांनी पाठिंबा दिला. मात्र आता या पाठिंब्यांनांतर संजय राऊत यांना धमकीचे फोन येत आहेत.
“अजितदादांना मुख्यमंत्री करायचं”, आमदार निलेश लंके यांचे वक्तव्य चर्चेत
दरम्यान या धमकीच्या फोननंतर या प्रकरणाची चौकशी करा, अशी मागणी संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे. संजय राऊत म्हणाले, वारीसे यांचा विषय उचलू नका म्हणून मला धमकी आली आहे.याबाबत मला फोन देखील येत आहेत. असं राऊत यावेळी म्हणाले आहेत.
शरद पवारांचा नरेंद्र मोदींना टोला; म्हणाले, “पंतप्रधानांची किंमत…”