राजकीय वर्तुळात सध्या मोठ्या-मोठ्या हालचाली होत आहेत. नुकत्याच काही पदवीधर मतदारसंघांच्या निवडणूका पार पडल्या. अशातच कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुका जाहीर झाल्या आहेत. यामध्येच आता कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांची घोषणा देखील करण्यात आली आहे.
कोल्ड्रिंक्सने भरलेला कंटेनर पलटी; कोल्ड्रिंक्स नेण्यासाठी लोकांची तुफान गर्दी
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कसबा विधानसभा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आला आहे. तर चिंचवड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आपला उमेदवार उभा करणार आहे. कसबा मतदारसंघातून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर तर चिंचवड विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादीचे राहुल कलाटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
ब्रेकिंग! कसबा-चिंचवड पोटनिवडणुकांसाठी भाजपचे उमेदवार जाहीर
महाविकास आघाडीकडून उमेदवारी कोणाला मिळणार याबाबत अनेक चर्चा चालू होत्या मात्र आता या चर्चाना पूर्णविराम मिळाला आहे. दरम्यान, या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी व भाजप समोरा समोर लढणार आहेत. कसबा व चिंचवड ( Kasba & Chinchwad Elections) येथील निवडणुका बिनविरोध होतील. अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सगळ्या शक्यता फेटाळून लावल्या आहेत. या निवडणुकांसंदर्भात काल तिन्ही पक्षांची बैठक पार पडली.