आज चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यामध्ये IPL चा अंतिम महामुकाबला होणार आहे. महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) त्याची रिटायरमेंट घोषित करतोय की काय अशी भीती सर्वत्र पसरली आहे. चेन्नईचा थाला (Thala) म्हणून चाहत्यांमध्ये माही खूप प्रसिद्ध आहे. परंतु धोनीच्या ऐवजी चेन्नईच्या दुसऱ्या बड्या खेळाडूने चाहत्यांना धक्का बसेल असा निर्णय घेतला आहे.
नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाबाबत शरद पवार म्हणाले, “मी गेलो नाही याचा मला आनंद आहे…”
भारतीय क्रिकेटपट्टू व उजव्या हाताचा फलंदाज आणि अधूनमधून विकेटकीपिंग करणारा, चेन्नईचा स्टारप्लेयर अंबाती रायडू (Ambati Rayudu) याने त्याचं रिटायरमेंट घोषित केलं आहे. गेली कित्येक वर्ष अंबाती रायडू चेन्नई सुपर किंग्ससाठी खेळला आहे. चेन्नईला अनेक मॅचेस जिंकण्यामध्ये रायडूने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. परंतु त्याच्या या निर्णयामुळे चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. गुजरात टायटन्स विरुद्धच्या शेवटच्या सामन्याआधी अंबाती रायडूने निवृत्तीचा हा निर्णय घोषित केला आहे.
बैलगाडा शर्यतीसाठी सरकारची नियमावली जाहीर; वाचा सविस्तर नियमावली
गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील हा आयपीएलच्या सोळाव्या मोसमातील शेवटचा महामुकाबला आहे. हा मुकाबला नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Narendra Modi stadium) खेळला जाणार आहे. आयपीएलच्या अंतिम मॅचमध्ये खेळण्याची चेन्नईची दहावी तर गुजरातची ही सलग दुसरी वेळ आहे. आज या दोन संघांमध्ये विजेतेपदासाठी झुंज पाहायला मिळणार आहे. परंतु या मॅचआधीच रायडूने चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. रायडूने ट्विट करत ही माहिती दिली आहे.
बैलगाडा शर्यतीसाठी सरकारची नियमावली जाहीर; वाचा सविस्तर नियमावली
रायुडूने २०१३ मध्ये झिम्बाब्वेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची यशस्वी सुरुवात केली. तो त्याच्या स्टाईलिश फलंदाजी तंत्रासाठी आणि स्ट्राइक रोटेसाठी ओळखला जातो. तथापि, त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द अधूनमधून दिसली आणि त्याला अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला. रायुडू बडोदा, आंध्र प्रदेश आणि हैदराबादसह भारतातील विविध देशांतर्गत संघांसाठी खेळला आहे. तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. त्याने अनेक फॉरमॅटमध्ये धावा केल्या आहेत. इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये रायुडूने मुंबई इंडियन्स (MI) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) सारख्या संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. अंबातीचा एकंदरीत प्रवास असा आहे. परंतु तो एवढ्या लवकर रिटायरमेंट घोषित करेल अशी अपेक्षा कोणालाही नव्हती. अंबाती रायुडूने ट्विट करत क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याची माहिती दिली आहे.
यंदाच्या वर्षी २५ हजार शेतकऱ्यांना मिळणार ट्रॅक्टरसाठी अनुदान; अर्जही झाले दाखल
” २ दिग्गज संघ मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) व चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super kings) . २०४ मॅच, १४ हंगाम, ११ प्लेऑफ, ८ फायनल, ५ ट्रॉफी. आज रात्री सहावी ट्रॉफी जिंकू…. माझ्यासाठी हा खूप मोठा प्रवास आहे. आयपीएलमधील आजचा सामना हा माझा शेवटचा सामना असेल. मी या स्पर्धेसाठी खूप उत्सुक आणि आनंदी आहे. सर्वांचे मनापासून आभार मानतो. No U turn “, अशी माहिती अंबातीने आपल्या ट्विटमध्ये दिली आहे.
सहा मुलांच्या आईवर प्रेमाचे भूत! प्रेमसंबंधांमुळे केला पतीचा खून…
अंबाती रायडूच्या या निर्णयामुळे चाहत्यांनी कमेंट्स करत आपापल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. एका चाहत्याने अशी प्रतिक्रिया दिली आहे की, आम्ही या सीझनमध्ये बाहुबली अंबाती रायडूचे साक्षीदार आहोत. खरोखरच खूप चांगला प्लेयर आहे आता आम्हाला एक संस्मरणीय मॅच पाहिजे. तर दुसऱ्या चाहत्याने अशी कमेंट केली आहे की, तू चॅम्पियन आहेस. या सर्व मॅचेससाठी धन्यवाद. जेव्हा तु फॉर्ममध्ये असतो तेव्हा, तु खरोखरच दर्जेदार खेळतोस. अशा कमेंट्स करत चाहत्यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.