बिग ब्रेकिंग! दोन गटात हाणामारी, हल्ल्यात राष्ट्रवादीचा पदाधिकारी गंभीर जखमी

Big Breaking! Clash between two groups, official of NCP seriously injured in the attack

अहमदनगर (Ahmednagar) येथील सावेडी उपनगरातील एकविरा चौकात एक धक्कादायक घटना घडली आहे. या शहरात दोन गटात तुफान राडा झाला असून या घटनेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (NCP) एक पदाधिकारी गंभीर जखमी झाला आहे. अंकुश चत्तर असे या जखमी झालेल्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. त्यांना उपचारासाठी शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Latest Marathi News)

पशुपालकांसाठी आनंदाची बातमी.. पशुधन खरेदीसाठी मिळेल अवघे ४ टक्के व्याजाने कर्ज, या सोप्या पद्धतीने करा अर्ज

मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगरमधील सावेडी उपनगरातील एकविरा चौकात शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास दोन गटांमध्ये हाणामारी झाली. तसेच यावेळी दगडफेक झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत राष्ट्रवादीचा एक पदाधिकारी गंभीर जखमी झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलिसांनी (Police) घटनस्थळी धाव घेतली.

महेश कोठारे यांच्यावर कोसळला मोठा दुःखाचा डोंगर; वडिलांनंतर आईचेही झाले निधन

परंतु या घटनेनंतर शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. शहरात अचानक कोणत्या कारणामुळे झाला याचे कारण अजूनही स्पष्ट होऊ शकले नाही. या प्रकरणी अधिक तपास तोफखाना पोलिसांकडून सुरु आहे.

Havaman Andaj : राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पाऊस; ‘या’ भागांमध्ये यलो अलर्ट

Spread the love