मागच्या दोन वर्षांपासून कोरोनाने (Corona) थैमान घातला आहे. आत्ता कुठेतरी हे वातावरण शांत झालेलं होत. पण परत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाला आहे. त्यामुळे आता जागाच टेंन्शन वाढलं आहे. गेल्या २४ तासांमध्ये चीनमध्ये (China) बऱ्याच कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. एका दिवसात जवळपास ३१ हजार नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत.
“निकाल लावलाच पाहिजे…”, कोश्यारींनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी शरद पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया
कोरोना रुग्णांची वाढती संख्या आता चिंतेचा विषय बनली आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासनासमोर (Health Administration) देखील चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. अनेक ठिकाणी लॉकडाऊन लागू करण्यात आले असून सरकारकडून पुन्हा एकदा निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्याचबरोबर अनेक सार्वजनिक कार्यक्रम देखील रद्द करण्यात आले आहेत.
डिझेलचा टँकर व ट्रॅक्टरचा भीषण अपघात; तब्बल दीड तास सुरू होता अग्नितांडव
दरम्यान, चीनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने खबरदारी म्हणून शाळा बंद करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर चीन सरकारने बीजिंगमधील (Beijing) अनेक जिल्ह्यांतील शाळा बंद केल्या आहेत. आता पाहिल्यासारखं पुन्हा ऑनलाईन शिक्षण होणार आहे. बीजिंगमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
पोलीस भरतीच्या पुढच्या प्रक्रियेला स्टार्टर; मैदानी चाचणीसाठी उमेदवार लवकरच मैदानात