
एखादी व्यक्ती मोठ्या पदावर पोहीचली की त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न देखील निर्माण होतो. त्यातल्या त्यात राजकिय वर्तुळात असणाऱ्या व्यक्तींना तर धोका अधिक असतो. या लोकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांना कायम कटिबद्ध रहावे लागते. कारण जितकं मोठं पद तितक जीवाचं मोल जास्त ! सध्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ठार मारण्याचा धमक्या मिळत असून त्यांच्या जीवाला धोका ( danger for PM) निर्माण झाल्याची माहिती मिळत आहे.
नवले पुलावरच्या अपघाताचे खरे कारण आले समोर; वाचून तुम्हालाही बसेल धक्का
मुंबई पोलीसांच्या वाहतून शाखेच्या कंट्रोल रूमच्या क्रमांकावर मंगळवारी ( दि.22) अनेक व्हाटसअप मेसेजेस आले. यामध्ये काही ऑडिओ क्लिप व टेक्स्ट मेसेजेसचा समावेश आहे. या मेसेजमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मागील दोन दिवसांपासून अशा प्रकारचे मेसेजेस येत आहेत. या मेसेजमुळे खळबळ उडाली असून वाहतून शाखेने याबाबत वरिष्ठांना माहिती दिली आहे.
मानसी नाईकच्या नवऱ्याबद्दल ‘या’ गोष्टी माहीत आहेत का? वाचा सविस्तर
संबंधित ऑडिओ क्लिपमध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे गुंड देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या करणार असून, देश उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत असे सांगण्यात आले आहे. मेसेज करणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांच्या सांगण्यानुसार, मेसेज करणारा व्यक्ती पूर्वी एका डायमंड कंपनीत दागिने घडवणारा कारागीर होता. परंतु, मानसिक आजारामुळे त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे. मागील एक वर्षांपासून तो बेरोजगार आहे. या सगळ्यातून त्याने हे कृत्य केले आहे.
तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर सफाई कामगाराने केला बलात्कार