
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याच्या धमकीचा फोन ( Death threat) आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे. एकदा नाही, दोनदा नाही तर तब्बल तीनदा नितीन गडकरी यांना धमकीचा फोन येऊन गेला आहे. यामुळे नितीन गडकरी यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
भारतीय क्रिकेट विश्वावर शोककळा! क्रिकेट संघातील ‘या’ महत्त्वाच्या खेळाडूचा मृत्यु
आज ( दि.14) सकाळी साडे अकराच्या सुमारास धमकीचा पहिला फोन आला होता. नितीन गडकरी ( Nitin Gadkari) यांच्या खामला येथील जनसंपर्क कार्यालयात हा फोन आला होता. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी खामला जनसंपर्क कार्यालयात धाव घेतली असून तपास सुरू आहे.
बारामतीमधील अल्पवयीन मुलांना गाडी चालवायला दिल्याने पोलिसांकडून थेट पालकांवरव कारवाई
प्राथमिक माहितीनुसार भाजपचे जेष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासाठी आलेल्या या धमकीच्या कॉलवर जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मला खंडणी द्या अन्यथा मी गडकरींना जिवंत सोडणार नाही असे यामध्ये सांगण्यात आले आहे. तसेच या कॉलवर दाऊद नावाचा देखील उल्लेख करण्यात आला आहे.
मकर संक्रांतीनिमित्त ‘या’ गावात पतंग उडवण्यास बंदी!
याबाबत पोलीस तपास करत आहेत. नितीन गडकरी सध्या नागपूर दौऱ्यावर असून घटनेचे गांभीर्य लक्षात घेता त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. गडकरींचे निवासस्थान व त्यांच्या कार्यालयात देखील सुरक्षा वाढविण्यात आली आहे.
‘या’ राजकीय महानाट्याचे सुद्धा फडणवीसच सूत्रधार; म्हणून तर सत्यजित तांबेंनी पाहिले आमदारकीचे स्वप्न!