सध्या एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. गायक कैलाश खेर (Singer Kailash Kher) स्टेजवर परफॉर्म करत असतांना त्याच्यावर काही तरुणांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
वर्ल्डकप जिंकल्यानंतर ढसाढसा रडू लागली शेफाली वर्मा
घटना अशी घडली की, कर्नाटकातील हंपी महोत्सवानिमित्त गायक कैलाश खेर यांचा कार्यक्रम होता. दरम्यान या कार्यक्रमावेळी खेर यांच्यावर तरुणांनी पाण्याची बाटली फेकली. ही घटना रविवार संध्याकाळी घडली आहे. कैलाश खेर यांच्यावर बाटली फेकल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
धनुष्यबाण चिन्ह कोणाचे? आज लेखी युक्तीवादासाठीचा अखेरचा दिवस
दरम्यान, संगीतातील एक लोकप्रिय नाव म्हणून कैलाश खेर यांना ओळखले जाते. कैलाश खेर यांनी बॉलिवूडमध्ये देखील मोठं नाव कमावलं आहे. त्यांची गाणी अनेकांच्या मनावर राज्य करत आहेत. त्यांचा चाहतावर्ग देखील खूप मोठा आहे.