अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची तब्येत खलावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्या दिल्लीमधील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) मध्ये आहेत. अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांची नियमित तपासणी केली जात आहे. मात्र सोबतच त्यांच्या पोटात संसर्ग झाल्याने त्यांना एम्स ( AIMS) च्या खासगी वॉर्ड मध्ये दाखल केले आहे.
ब्रेकिंग! तुनिषाच्या मृतदेहावर आज होणार अंत्यसंस्कार
शनिवारी ( दि. 24) चेन्नईतील तामिळनाडू डॉ. एमजीआर मेडिकल युनिव्हर्सिटीच्या 35 व्या वार्षिक दीक्षांत समारंभ झाला. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हजेरी लावली. सीतारामन यांना तेथील जेवणातून बाधा झाल्याची माहिती दिली जात आहे. यामुळे एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच महत्त्वाची गोष्ट म्हणजे सीतारामन यांच्यावर कोणत्या आजारासंदर्भात उपचार सुरू आहेत याबाबत सविस्तर माहिती कोणालाच देण्यात आली नाही.
ऑपरेशन करताना डॉक्टर हिरवा पोशाखच का घालतात? वाचा याबद्दल सविस्तर माहिती
निर्मला सीतारामन ( Nirmala Seetaraman) या मागील अनेक वर्षांपासून देशाच्या अर्थमंत्री आहेत. भारतातील आतापर्यंतच्या दुसऱ्या महिला अर्थमंत्री म्हणून त्या ओळखल्या जातात. २०१४ पासून त्या भारतीय संसदेच्या वरिष्ठ सभागृहाच्या राज्यसभेच्या सदस्या आहेत. तसेच भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्या म्हणून देखील काही काळ त्यांनी काम पाहिले आहे. याआधी त्यांनी संरक्षण मंत्री म्हणून सुद्धा काम केले आहे. पुढच्या वर्षी म्हणजेच २०२३ मध्ये त्याच देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करणार आहे.
कुत्र्याच्या एका चुकीमुळे मालकाचे नुकसान! संपूर्ण घर जळून खाक