सध्या एक महत्वाची माहिती समोर आली आहे. गेल्या सात दिवसांपासून राज्यातील सरकारी, निमसरकारी, शिक्षक आणि इतर अधिकाऱ्यांनी संप पुकारला होता. आता तो मागे घेत असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये संप करणाऱ्यांची प्रमुख मागणी ही जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी होती. आता याबाबत सरकार सकारात्मक असल्याचं संप समन्वय समितीकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे हा संप मागे घेण्यात आला आहे.
धक्कदायक घटना! रेल्वे स्टेशनवरील स्क्रीनवर चक्क ३ मिनिटे सुरू होता पॉर्न व्हिडीओ
राज्यात मागच्या काही दिवसापासून अवकाळी पावसानं थैमान घातलं आहे. शेतकऱ्यांच्या शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतीचे पंचनामे लवकरात लवकर करून मदत देऊ असं आश्वासन सरकारनं केलं होत. मात्र राज्यातील सरकारी कर्मचारी संपावर असल्यामुळे पंचनामे होत नाहीत त्यामुळे सरकारने याबाबत साकारात्म निर्णय देणार असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांनी उद्यापासून कामावर हजर रहावं असं आवाहन देखील करण्यात आलं आहे.
अबब! गाडीला लॉक असल्याने चोरट्यांनी चक्क टायर चोरून नेले
संपकऱ्यांच्या मागणीसाठी राज्य सरकारने एक अभ्यास समिती स्थापन केली असून येत्या तीन महिन्यात याबाबत अहवाल देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. जुन्या पेन्शन योजनेच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकारात्मक आहेत असं समन्वय समितीकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे हा संप मागे घेण्यात आला आहे.
मोठी बातमी! अमृता फडणवीस लाचप्रकरणी बुकी अनिल जयसिंघानीला अटक