कोल्हापूरमधून (Kolhapur) सध्या एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. कोल्हापूरमध्ये एका केमिकल कंपनीमध्ये भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. कोलापूरमधील गोकुळ (Gokul) शिवारातील Ceraflux India प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला आग लागली आहे.
जेष्ठ नागरिकांना मोफत देवदर्शन! मोठा मतदारवर्ग आपल्या बाजूला करण्यासाठी एकनाथ शिंदेंचा मोठा प्लॅन
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. सध्या या ठिकाणी आग विझवण्याचे काम सुरु आहे. आज दुपारी या कंपनीला आग लागलायची माहिती मिळत आहेत.
बिग ब्रेकिंग! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी
गोकुळ शिवारातील Ceraflux India प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला आग लागली असून या ठिकाणच्या नागरिकांना परिसरातून सुरक्षितस्थळी दाखल करण्याचे काम सुरु आहे. या कंपनीच्या नजीकच एक पेट्रोलियम कंपनी असल्याने या कंपनीला देखील मोठा धोका निर्माण झालाय.