Instagram: बिग ब्रेकिंग! इंस्टाग्रामचे अकाउंट होतंय अचानक सस्पेंड

Big Breaking! Instagram account is getting suspended suddenly

सध्या सर्वजण सोशल मीडिया (Social media) वापरतात. यामध्ये इंस्टाग्राम वापरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे, दरम्यान अचानक त्यांचे खाते सस्पेंड (suspend) केले जात असल्याची माहिती समोर येत आहे. काल दुपारी दीड वाजल्यापासून हा प्रॉब्लेम येत आहे.

न्यायालयाचा मोठा निर्णय! पोलिस स्टेशनमध्ये तुम्ही करू शकता व्हिडीओ रेकॉर्डिंग

माहितीनुसार, इंस्टाग्राम (Instagram) वापरकर्त्यांना सांगण्यात आले होते की त्यांच्याकडे 30 दिवस आहेत, नंतर त्यांचे खाते सस्पेंड केले जाईल. हा इशारा हजारो युजर्सना देण्यात आलाय. कम्युनिटी गाइडलाईन्सचे पालन न केल्यामुळे ही कारवाई केली जात असल्याची माहिती समोर येत आहे.

Vanita Kharat: “लग्नाची पहिली रात्र आणि…”, वनिता खरातच्या जाहिरातीचा व्हिडीओ व्हायरल, पाहा VIDEO

इंस्टाग्रामच्या या समस्येमुळे इंस्टाग्राम युजर्सचा संताप वाढला आहे. मागच्या चार पाच दिवसांपूर्वी व्हाट्सअप देखील दोन तासांसाठी बंद पडले होते आणि आता इंस्टाग्राम त्यामुळे युजर्सकडून वेगेवेगळे प्रश्न केले जात आहेत. अनेक युजर्सची फॉलोवर्सची संख्या देखील कमी झाली आहे.

ब्रेकिंग! बँकांचे नवीन नियम, आता फोन पे आणि गुगल पेवर लागणार शुल्क

इंस्टाग्रामने याबाबत एक ट्विट देखील केले आहे, त्यांनी म्हंटल आहे की,”आम्हाला माहिती आहे की तुमच्यापैकी काहींना तुमच्या इंस्टाग्राम अकाउंट वापरण्यात अडचणी येत आहेत. आम्ही ते पाहत आहोत आणि गैरसोयीबद्दल दिलगीर आहोत”.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *