भाजपचे आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. आमदार जयकुमार गोरे हे आपल्या कार्यकर्त्यांसोबत म्हसवड या ठिकाणी इफ्तार पार्टीसाठी (Iftar Party) चालले होते. त्यावेळी त्यांच्या गाडीचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. रात्री आठच्या सुमारास हा अपघात झाला आहे.
गोंदवले बुद्रुक (Budruk) या ठिकाणच्या चौकामध्ये अपघात झाला आहे. या अपघातामध्ये गाडीचं मोठं नुकसान झालं असून गाडीत आमदार गोरेंचे कार्यकर्ते होते. यांच्या गाडीला ट्रॅव्हल्सनं जोरदार धडक दिली आहे.
अभिनेत्री स्वरा भास्कर एका चित्रपटासाठी घेते ‘इतके’ पैसे; वाचून तुम्हालाही बसेल धक्का
चौकामध्ये मोठ्याप्रमाणात गर्दी होती यावेळी ट्रॅव्हल्स मागे घेताना गोरेंच्या गाडीच्या पुढील दारावर जोरदार धडक दिली. आणि हा अपघात झाला. यावेळी ही धडक इतकी जोरात होती की, गोरेंचे वाहन काही फूट ढकलत गेलं. मात्र मोठा अनर्थ टळला असल्याचे बोलले जात आहे.
गौतमीचा कार्यक्रम सुरु झाला अन् महिलांनी केलं असं कृत्य की सर्वजण पाहतच राहिले; पाहा Video