बिग ब्रेकिंग! राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना अटक

Big Breaking! NCP leader Jitendra Awad arrested

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) यांना अटक झाल्याची माहिती समोर आली आहे. ठाण्यातील वर्तकनगर पोलिसांनी जितेंद्र आव्हाड यांना ताब्यात घेतले आहे. काल ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुरु असलेला हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडला होता व प्रेक्षकांना मारहाण केली याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे.

गुजरात निवडणुकीमुळे पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता

अटकेनंतर एका वृत्तसंस्थेशी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले आपण जामीन घेणार नाही. याबाबत जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट देखील केले आहेत. पहिल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हंटले की, “मी पोलीस स्टेशनला गेलो असताना त्यांनी मला गप्पांमध्ये गुंतवून ठेवलं. त्यानंतर डीसीपी राठोड हे पोलीस स्टेशनला आले. त्यांच्या डोळ्यांत आणि चेह-यावरती अस्वस्थपणा दिसत होता. हतबलता दिसत होती. ते आदराने म्हणाले कि, मी काही करु शकत नाही. वरुन आदेश आले आहेत. तुम्हांला अटक करावी लागेल”.

येत्या चार दिवसात जनावरांचे बाजार होणार सुरु! पशुसंवर्धन विभागाने दिली माहिती

नंतर दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी म्हंटले की, “हा पोलीसी बळाचा गैरवापर आहे. आता मी लढायला तयार आहे. फाशी दिली तरी चालेल. पण, मी जे केलेलं नाही तो मी गुन्हा कबूल करणार नाही”.

काँग्रेस व ठाकरे गटाला मोठा धक्का; ‘हे’ नेते शिंदे गटात प्रवेश करणार

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *