बिग ब्रेकिंग! मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादीला मिळणार नाही संधी? तर ‘हे’ नेते घेणार मंत्रिपदाची शपथ

Big Breaking! NCP will not get a chance in cabinet expansion? So 'this' leader will take the oath of ministerial post

राज्यात शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis) सरकार स्थापन होऊन एक वर्ष उलटले तरीही या सरकारचा अजून मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. त्यात शिंदे-फडणवीस सरकारसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) सहभागी झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह इतर ८ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे आता मंत्रिमंडळात राष्ट्रवादीलाही संधी द्यावी लागणार आहे. (Latest Marathi News)

Monsoon Update । राज्यात पावसाचे थैमान! अंगावर झाड पडल्याने आतापर्यंत ४ जणांचा बळी

राज्यात लवकरच दुसऱ्या टप्प्यातील विस्तार (Cabinet expansion) होणार आहे. याबाबत शिवसेनेचे आमदार भरत गोगावले (Bharat Gogave) यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. “भाजप आणि शिवसेनेत (BJP and Shivsena) फिफ्टी-फिफ्टीचा फॉर्म्युला ठरला आहे, येत्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना आणि भाजपचे प्रत्येकी 7 मंत्री शपथ घेणार आहेत. त्यामुळे आम्हाला तयार राहण्यास सांगितले आहे असे गोगावले यांनी स्पष्ट केले.

Ajit Pawar । अजित पवार मुख्यमंत्री होणार! भाजप नेत्याच्या दाव्याने खळबळ

सूत्रांच्या माहितीनुसार शिवसेनेचे आमदार भरत गोगावले, अनिल बाबर, योगेश कदम यांचं नाव मंत्रिपदासाठी निश्चित करण्यात आले आहे. तर चौथ्या नावासाठी संजय शिरसाट आणि योगेश रायमूलकर यांच्यामध्ये चुरस आहे अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आगामी मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला स्थान मिळणार नाही अशी माहिती सूत्रांकडून दिली आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

अजित पवारांना पुतण्या देणार शह! आगामी निवडणुकीसाठी पवार कुटुंबातील ‘या’ सदस्याची चर्चा

दरम्यान,वर्षभर रखडलेल्या दुसऱ्या टप्प्यातील विस्ताराची चांगलीच चर्चा सुरु आहे. त्यामुळे राज्य सरकारला अनेकवेळा विरोधकांच्या टीकेला सामोरे जावे लागले होते. सत्तेत सहभागी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला येत्या मंत्रिमंडळात संधी दिली जाणार नसल्याने राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

ब्रेकिंग! छगन भुजबळ यांच्यानंतर धनंजय मुंडेंनाही जीवे मारण्याची धमकी; राजकीय वर्तुळात उडाली खळबळ

Spread the love