Site icon e लोकहित | Marathi News

बिग ब्रेकिंग! जितेंद्र आव्हाडांना जामीन मंजूर

Big Breaking! No bail granted to Jitendra Awad

ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुरु असलेला हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडला होता व प्रेक्षकांना मारहाण केली याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. दरम्यान, आता पुन्हा एकदा त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका 40 वर्षीय महिलेच्या विनयभंगाचे प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी आव्हाडांविरुद्ध कलम 354 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण आता जितेंद्र आव्हाड यांना दिलासा मिळाला आहे.

सर्वसामान्यांसाठी दिलासदायक! खाद्यतेलाचे भाव उतरले…

राष्ट्रावादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला केल्याची माहिती समोर आली आहे. कळवा आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या कळवा-खाडी पुलाचे उद्घाटन झाले. यावेळी शिंदे, श्रीकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड हे यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान एका महिलेने आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विनयभंग केल्याचा आरोपाखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

रोहित पवारांचा विरोधकांना दिला इशारा; म्हणाले,”…कोंबडं झाकलं म्हणून सूर्य उगवायचा रहात नाही”

दरम्यान, या प्रकरणानंतर जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा देणार असल्याचे देखील सांगितले होते. त्यांनी एक ट्विट देखील केले होते. ट्विट करत त्यांनी लिहिले की, “पोलीसांनी माझ्या विरुद्ध ७२ तासात २ खोटा गुन्हा दाखल केला आणि तोही ३५४ ,., मी ह्या पोलिसी आत्याचारा विरुद्ध लढणार … मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे,,. लोकशाहीची हत्या .. उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत”.

अरे बापरे! चक्क बस स्थानकातून एसटी बस गेली चोरीला; वाचा सविस्तर

Spread the love
Exit mobile version