आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) सध्या औरंगाबाद (Aurangabad) दौऱ्यावर आहेत. दरम्यान यावेळी आदित्य ठाकरे आणि अंबादास दानवे यांच्या गाडीसमोर काहीजणांनी गोंधळ घातला. त्याचबरोबर आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यावर दगडफेक देखील करण्यात आली. यांनतर अंबादास दानवेंनी प्रतिक्रिया देत शिंदे गटातील आमदारांच्या कार्यकर्त्यांनी गाडीवर हल्ला केल्याचा गंभीर आरोप केला आहे. मात्र पोलिसांनी हे फेटाळून लावले आहे.
“…अन् शेतकरी आजोबांनी इंग्रजी मधून बोलायला सुरुवात केली”, व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क!
औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले असल्याची माहिती समोर आली आहे. आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर एकही दगड फेकण्यात आला नाही. असा दावा औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस उपअधीक्षक सुनिल लांजेवार यांनी केलाय.
शिवसेना आक्रमक! राज्यपाल भगतसिंग कोश्यारी विरोधात जेलभरो आंदोलन
एका वृत्तवाहिनीशी बोलताना सुनिल लांजेवार म्हणाले, आदित्य ठाकरे सभेवरून निघाले असता थोडा गोंधळ झाला आहे. मात्र यामध्ये कोणत्याही प्रकारची दगडफेक झालेली नाही. असं पोलीस उपअधीक्षक सुनिल लांजेवार म्हणाले.
“मी तुम्हाला करते मुजरा”, गौतमी पाटीलच नवीन गाणं रिलीज होताच नेटकऱ्यांनी घेतलं डोक्यावर!