
पुढच्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईच्या (Mumbai) दौऱ्यावर येणार असल्याची माहिती समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यावेळी अनेक सेवांचे उद्घाटन आणि भूमीपूजन करण्यात येणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिली आहे.
ब्रेकिंग! अमोल मिटकरी यांच्या ‘त्या’ विधानामुळे बच्चू कडूंच्या अपघाताबद्दल संशय वाढला
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) हे मुंबई दौऱ्यावर असताना त्यांच्या हस्ते मुंबई मेट्रो 2 ए (Mumbai Metro 2A) आणि मेट्रो 7 (Mumbai Metro 7) या मार्गिकेवरील सेवांचे उद्घाटन होणार आहे. त्याचबरोबर मुंबई महापालिकेच्या काही प्रकल्पांचे भूमीपूजन देखील करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
धक्कादायक! सिलिंडरचा स्फोट होऊन आख्ख कुटुंब उध्वस्त
मुंबई महापालिकांच्या (Mumbai Municipality) आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे. मुंबई मेट्रो 2 ए आणि मेट्रो 7 च्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन मागच्या वर्षी करण्यात आले होते. मात्र आता मार्गिकेवरील दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून या मार्गिकेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
“फक्त बारामतीचा विकास केला म्हणजे मतदारसंघाचा विकास होत नाही” – चंद्रशेखर बावनकुळे