एनडीटीव्हीच्या संचालक मंडळातून नुकताच प्रणव रॉय आणि राधिका रॉय यांनी राजीनामा दिला होता. एनडीटीव्हीची मालकी अदानी समूहाकडे आल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रणव रॉय व राधिका रॉय ( Pranav Roy & Radhika Roy) यांच्या पाठोपाठ जेष्ठ पत्रकार व एनडीटीव्ही चे कार्यकारी संपादक रवीश कुमार यांनी देखील राजीनामा दिला आहे. रवीश कुमार हे गेले 20 वर्षे एनडीटीव्ही ( NDTV ) सोबत काम करत होते.
ऊस उत्पादकांसाठी खूशखबर! अखेर राज्यसरकारने एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय घेतला
रवीश कुमार ( Ravish kumar) यांच्या पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना अनेक मोठे पुरस्कार मिळाले आहेत. यामध्ये रॅमन मॅगसेसे या पुरस्काराचा सुद्धा समावेश आहे. प्राइम टाइम, रवीश की रिपोर्ट, हम लोग, देस की बात हे रवीशकुमार यांचे न्यूज शो भरपूर प्रसिद्ध आहेत. इतकंच नाही तर त्यांना एनडीटीव्ही इंडियाचा ‘प्रमुख चेहरा’ असे मानले जाते. असे असताना रवीश कुमार यांनी राजीनामा दिल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे.
बिग ब्रेकिंग! ज्येष्ठ साहित्यिक समीक्षक नागनाथ कोत्तापल्ले याचे निधन
दरम्यान एनडीटिव्हीची सर्व मालकी सध्या अदानी समूहाकडे आली आहे. काही दिवसांपूर्वी अदानी समूहाने एनडीटीव्हीमध्ये 30 टक्के शेअर विकत घेतले होते. मात्र एनडीटीव्हीची होल्डींग कंपनी असलेल्या RRPRH च्या संचालक मंडळातून राधिका रॉय आणि प्रणव रॉय यांनी राजीनामा दिल्याने आता संपूर्ण एनडीटीव्हीची मालकी अदानी समूहाकडे आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे असे असले तरीही प्रणव रॉय व राधिका रॉय यांच्याकडे अजूनही एनडीटीव्हीचे 32. 26 टक्के शेअर्स आहेत.
शिंदे गटाला मोठा धक्का! शिंदे गटातील ‘या’ नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश