बिग ब्रेकिंग! शाईफेक प्रकरणात ताब्यात घेतलेल्या पत्रकाराची सुटका

Big Breaking! Release of detained journalist in Shaifek case

राज्याचे शिक्षणमंत्री यांनी देशात शाळा सुरू करणाऱ्या समाजसुधारकांबद्दल चुकीचे विधान केले आहे. यापार्श्वभूमीवर ते चांगलेच चर्चेत आहेत. देशात शाळा सुरू करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले व कर्मवीर भाऊराव पाटील यांना सरकारकडे अनुदान मागितल न्हवतं. त्यांनी भीक मागून शाळा सुरू केल्या असे वक्तव्य चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil) यांनी केले आहे. ज्या लोकांमुळे देशात शैक्षणिक क्रांती झाली. त्यांच्याबद्दल असे अपमानजनक वक्तव्य केल्याने सर्वच स्तरांतून चंद्रकांत पाटील यांच्यावर संताप व्यक्त केला जातोय.

शेतकऱ्यांसाठी आनंददायक! पीएम किसान योजनेतील हप्त्याची रक्कम वाढण्याची शक्यता

दरम्यान पिंपरी चिंचवड येथे एका कार्यक्रमात उपस्थित असलेल्या चंद्रकांत पाटील यांच्यावर एका व्यक्तीने निषेध नोंदवत शाईफेक केली. याचा व्हिडीओ देखील व्हायरल होतोय. या प्रकरणी गोविंद वाकडे या पत्रकाराला अटक करण्यात आली होती. मात्र नुकतेच त्यांना सोडण्यात देखील आले आहे. शाईफेक करणाऱ्या आरोपींच्या संपर्कात गोविंद वाकडे ( Govind wakade) आधीपासूनच होते. अशी माहिती पोलिसांकडे होती. इतकंच नाही गोविंद वाकडे व आरोपी यांच्यातील whatsapp चॅट व फोन कॉल देखील पोलिसांना सापडले आहेत.

हा तर नवीनच नखरा! साडी घालून उर्फी जावेद पोहचली विमानतळावर; पाहा VIDEO

गोविंद वाकडे यांच्या अटकेमुळे राज्यातील पत्रकार संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या होत्या. यावेळी पत्रकार संघटनांच्या मागणीमुळे पत्रकार गोविंद काकडे यांच्यावरील गुन्हे मागे घेऊन त्यांना पिंपरी चिंचवड पोलीस ठाण्यातून सोडण्यात आले आहे. यामुळे पत्रकार संघटनांचे आजचे SMS आंदोलन रद्द करण्यात येणार आहे. अशी माहिती मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एस. एम. देशमुख यांनी दिली आहे. तर प्रकरणातील मुख्य आरोपी अजूनही पोलीस कोठडीतच आहे.

‘या’ वकिलाने केली मोठी घोषणा! चंद्रकांत पाटलांवर शाई फेकणाऱ्याचा खटला मोफत लढणार

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *