राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने ते चांगलेच चर्चेत आले आहेत. यामुळे राजकीय वातावरण देखील चांगलेच तापले आहे. अशातच आता चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकून हल्ला करण्यात आला आहे.
आली लहर केला कहर! उर्फी जावेदने चक्क सायकलच्या चेनपासून बनवला ड्रेस; पाहा VIDEO
चंद्रकांत पाटील यांच्या भोवती अंगरक्षक असून देखील कार्यकर्त्यांनी त्यांच्या अंगावर शाई फेकून हल्ला केलाय. चिंचवड गावामध्ये ते एका कार्यकर्त्याच्या घरी गेले असता त्या ठिकाणी हा सर्व प्रकार घडला आहे.
‘सैराट’वर अनुराग कश्यप यांची टीका; म्हणाले, “सैराटने मराठी चित्रपट सृष्टीला…”
काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?
चंद्रकांत पाटील म्हणाले, “ पहिल्या काळात शाळांसाठी अनुदान देत नव्हते. तरीदेखील महापुरुषांनी शाळा उघडल्या. पण, आता लोकं शाळांच्या अनुदानासाठी सरकारवर अवलंबून राहत आहेत. त्याकाळी महापुरुषांना सरकारनं शाळा सुरु करण्यासाठी अनुदान दिले नाही, त्यांनी लोकांकडं भीक मागितली”.
धक्कादायक! क्रिकेट खेळत असताना हृदयविकाराचा झटका येऊन दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू