मुंबई: प्लास्टिक (Plastic) ही अशी गोष्ट आहे जी खूप काळ टिकते. त्यामुळे या प्लास्टिकची व्यवस्थित विल्हेवाट होत नसल्याने महाराष्ट्र सरकारने (Government of Maharashtra) प्लास्टिक वर बंदी घातली होती. पण आता महाराष्ट्र सरकारने 2018 पासून राज्यव्यापी प्लास्टिक वस्तूंवरील बंदी अंशतः उठवली असल्याची माहिती समोर आली आहे.
मोठी बातमी! माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा पहिला हप्ता २८५१ रुपये
या अंतर्गत राज्य सरकारने स्ट्रॉ, कप, ग्लास, यासारख्या एकेरी वापराच्या प्लास्टिकच्या वस्तू वापरण्यास परवानगी दिली. सरकारच्या या निर्णयामुळे व्यापारी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. सोमवारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली पर्यावरण विभागाची बैठक झाली, त्यावेळी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.
“जोपर्यंत राज्यपालांची उचलबांगडी होत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही” – उदयनराजे भोसले
दरम्यान, राज्य सरकारने नोटिफिकेशनमध्ये पॅकेजिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या ५० मायक्रॉनपेक्षा कमी आणि प्रति चौरस मीटर ६० ग्रॅमपेक्षा कमी प्लास्टिकच्या वस्तूंना सूट दिली आहे.
मोठी बातमी! राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळेंना सेबीचा दणका