मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काही महिन्यांपूर्वी दिलेल्या राजकीय भूकंपाचे झटके ठाकरे गटाला अजूनही पचले नाहीत. तेव्हापासून ठाकरे गटाला (Thackeray Group) लागलेली गळती अजूनही सुरूच आहे. दरम्यान शिंदे गटाचे नेते कृपाल तुमाने यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अगामी काळात ठाकरे गटाचे उरलेले खासदार सुद्धा शिंदे गटात येतील, असा दावा कृपाल तुमाने (Krupal Tumane) यांनी केला आहे.
शिंदे गटाचे १३ खासदार निवडून येणार नाहीत असे संजय राऊत ( Sanjay Raut) म्हणाले होते. राऊत यांचा हा दावा फेटाळून लावत शिंदे गटाचे नेते कृपाल तुमाने यांनी मोठे वक्तव्य केले आहे. “आमच्या गटाचे सर्वच्या सर्व 13 खासदार विजयी होतील. तसेच ठाकरे गटाचे उरलेले खासदारही शिंदे गटात येतील. या खासदारांसोबत आमची बैठक झाली आहे.” असा गौप्यस्फोट तुमाने यांनी केला आहे.
प्रियांका चोप्राने दिग्दर्शकाबाबत केला धक्कादायक खुलासा; म्हणाली…
ठाकरे गटाकडे असणारे खासदार लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. काल मुंबईमध्ये ठाकरे गटाच्या त्या खासदारांसोबत आमची बैठक झाली, ते शिंदे गटात यायला तयार आहेत. लवकरच त्यांचा शिंदे गटात पक्षप्रवेश केला जाणार आहे. कृपाल तुमाने यांच्या या माहितीमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. नक्की कोणते नेते शिंदे गटात प्रवेश करणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.