बिग ब्रेकिंग! देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर बॉम्ब ठेवल्याची धमकी

Big Breaking! Threat of placing a bomb in front of Devendra Fadnavis' house

मुंबई | सध्याची सगळ्यात मोठी घडामोड समोर आली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांच्या घरासमोर बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली आहे. एका अज्ञात व्यक्तीनं फोन करुन ही धमकी दिली असल्याचं सांगितलं जात आहे. याघटनेमुळं मोठी खळबळ उडाली आहे.

मोठी बातमी! आमदार संजय शिरसाट यांच्यावर गुन्हा दाखल होणार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री दोन वाजता पोलिसांच्या कंट्रोल रुमला (control room) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर बॉम्ब ठेवल्याचा फोन आला होता. या फोननंतर पोलिसांनी तातडीने फडणवीसांच्या घरी बाॅम्ब शोधक पाठवलं होतं. तसेच फडणवीसांच्या घराशेजारी पोलीस सुरक्षा देखील वाढवण्यात आली होती.

रिझर्व्ह बँक ग्राहकांना मोठा झटका देण्याच्या तयारीत!

या आलेल्या फोनचा अधिक तपास पोलिसांकडून करण्यात आला. यानंतर हा काॅल फेक असल्याचं पोलिस तपासात आढळून आलं आहे. फोन करणारा इसम नागपूरच्या (Nagpur) भागात राहणारा आहे. रागाच्या भरात त्याने देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर बॉम्ब ठेवल्याचा फोन केला. दरम्यान, या इसमाला ताब्यात घेण्यात आलं असून त्याच्याविरोधात पुढील कारवाई केली जाईल.

शाहरुख खानने खरेदी केली आलिशान गाडी; किंमत ऐकुण व्हाल थक्क

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *