सध्या एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. मुंबईवर (Mumbai) दहशतवादी हल्ला (Terror Attack) करण्याची धमकी देण्यात आली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेला (NIA) याबाबत ईमेल (Email) आला आहे. या धमकीमुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे.
कमी खर्चात जास्त नफा; ‘अशी’ करा मुळ्याची शेती
या धमकीच्या मेलमुळे देशातील विविध शहरांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई पोलिसांना याबाबत एनआयएने माहिती दिली आहे. एनआयएच्या ईमेलवर मुंबईत दहशतवादी हल्ल्याची धमकी देणारा मेल आला होता.
आमदार फुटणार उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी आधीच दिली होती माहिती; अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
यानंतर हा मेल ज्या व्यक्तीने पाठवला त्याने आपण तालिबानी असल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर तालिबान संघटनेचा प्रमुख नेता सिराजुद्दीन हक्कानीच्या आदेशानुसार हा हल्ला करण्यात येणार असल्याचा दावा देखील केलाय. आता याबाबत इतर यंत्रणांसह मुंबई पोलिसांनीही तपासाला सुरुवात केली आहे.