
नाशिक: सध्या नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नाशिक पुणे महामार्गावर शिंदे पळसे टोल नाक्यावर एसटी बसने दोन वाहनांना धडक दिली. व अपघातानंतर एस टी बसने पेट घेल्याने बस जळून खाक झाली आहे. दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी.
दरम्यान, कार चालक अचानक थांबल्याने दोन एसटी कारवर धडकल्याची माहिती समोर आली आहे. पेट घेतल्लेली बस राजगुरूनगर आगारचा असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशामन दल घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे काम चालू आहे.
रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्या मधोमध अडकली मुलगी, आरपीएफ जवानांनी वाचविले प्राण; पाहा VIDEO
दरम्यान नाशिकमध्ये अपघात काही कमी होत नाहीत. मागच्या काही दिवसांपूर्वी देखील असाच बसचा अपघात झाला होता. नाशिकच्या नांदूर नाक्याजवळ खासगी बसचा अपघात झाला होता. यामध्ये जवळपास 35 प्रवासी गंभीर जखमी झाले होते. ही बस यवतमाळहून मुंबईकडे जात होती.
10 मिनिटांत घरी बसल्या बनवा पॅनकार्ड; ऑनलाइन पॅनकार्ड तयार करण्याची सोपी पद्धत