सध्या पंढरपूरमधून (Pandharpur) एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. देवदर्शनासाठी चाललेल्या एक ट्रॅव्हल्स पलटी होऊन २८ जण जखमी झाले आहेत तर एकाच मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हा अपघात मंगळवेढा तालुक्यातील (Mangalwedha) येड्राव फाटा या ठिकाणी झाला आहे.
ऋषभ पंतला ‘इतक्या’ दिवस राहवे लागणार रुग्णालयामध्ये; समोर आली महत्वाची अपडेट
माहितीनुसार, ट्रॅव्हल्स 38 भाविकांना देवदर्शनासाठी घेऊन चालली होती यावेळी ट्रॅव्हल्स पलटी झाल्यानं अपघात झाला आहे. या अपघातामध्ये २८ जखमी झाले असून ८ जनाची प्रकृती गंभीर आहे तर एका भाविकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे.
ब्रेकिंग! ५०० रुपये दंड आकारून राज ठाकरेंविरोधातील अजामीनपात्र अटक वॉरंट रद्द
सोलापुर (Solapur) जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यामधील येड्राव फाट्यावर हा भीषण अपघात झाला आहे. आज अपघात सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास झाला आहे. चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने बस पलटी झाल्याची माहिती समोर आली आहे.
बारामतीमध्ये ‘कृषीक 2023’ची जोरदार तयारी! 170 एकर परिसर होणार कृषिमय