शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी त्यांचा एक व्हिडीओ मॉर्फ करुन व्हायरल करण्यात आल्याचा आरोप करत पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवली आहे. याबाबत त्यांनी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर आरोप केले आहे. शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे आणि शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे यांचा एक व्हिडीओ मॉर्फिंग करुन अश्लील संदेश लिहून व्हायरल करण्यात आला होता. यामुळे आता याप्रकरणी शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. याबाबत दहिसर पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे.
नारायण राणे यांच मंत्रिपद जाणार, ठाकरे गटाच्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
या प्रकरणी शीतल म्हात्रे यांनी रविवारी पहाटे दहिसर पोलिसात तक्रार दाखल केली होती. आता याप्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेत दोघांना अटक कल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, हा व्हिडिओ कुणी बनवला आणि कुणी फोरवॉर्ड केला याचा तपास पोलिस यंत्रणा करत आहे.
‘त्या’ व्हायरल व्हिडिओवर शीतल म्हात्रे यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, “बाळासाहेबांचे संस्कार …”
दरम्यान, शुक्रवारी झालेल्या रॅलीतला हा व्हिडीओ होता जो एडिट करुन अश्लील करण्यात आला होता. हा व्हिडीओ ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकारींनी फेसबुकवर मातोश्री नावाच्या पेजसह तो व्हिडीओ अपलोड करुन व्हायरल केल्याचा आरोप यावेळी म्हात्रे यांनी केला आहे.
मोठी बातमी! शिंदे गटाच्या शीतल म्हात्रे यांचा मॉर्फ केलेला व्हिडीओ व्हायरल