बेळगाव: मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक (Maharashtra-Karnataka) सीमावाद चालू आहे. मात्र आता हा वाद आणखी चिघळला आहे. बेळगावजवळ हिरेबागवाडी कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक करण्यात आली आहे. त्यामुळे हा वाद अजून वाढण्याची शक्यता आहे.
मोठी बातमी! दुधाच्या दरात पुन्हा ३ रुपयांनी दरवाढ
यामध्ये कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या सहा ट्रकवर दगडफेक केली आहे. यामुळे तेथील टोलनाक्यावर वातावरण चिघळलं असून घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.
शेतकरी कुटुंबातील मुलाची यशाला गवसणी; MPSC ची परीक्षा उत्तीर्ण होऊन झाला PSI
एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, कन्नड रक्षण वेदिकेचे नेते नारायण गौडा आहेत. त्यांना पोलिसांनी त्यांना हा दौरा करण्यास मनाई केली होती तरी देखील ते बेळगावच्या दिशेने आले. त्यामुळे हिरेबागवाडी येथील टोलनाक्यावर पोलिसांनी त्यांना रोखलं. यावेळी संतापलेल्या कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक केल्याची माहिती समोर आली आहे.
पाणीपट्टी थकल्यामुळे ग्रामपंचायतीकडून गावकऱ्यांना थेट न्यायालयाची नोटीस; वाचा सविस्तर