डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू, तथा मराठी साहित्यातील ज्येष्ठ समीक्षक, प्रसिद्ध साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले (Nagnath Kottapalle) यांचे आज निधन झाले आहे. पुण्यामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांचा पुण्यात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
मोठी बातमी! गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याच्या निर्णयावर पुनर्विचार होणार
नागनाथ कोत्तापल्ले यांच्यावर मागच्या दोन दिवसांपासून ते आजारी असल्याने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात (Dinanath Mangeshkar Hospital) पुणे या ठिकाणी उपचार सुरू होते. पण उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, पुण्यामधील पहिले औंध उपनगरीय मराठी साहित्य संमेलन 2003 राज्यस्तरीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलन इत्यादी संमेलनांची अध्यक्षपदे कोतापल्ले यांनी भूषविली आहेत.
शिंदे गटाला मोठा धक्का! शिंदे गटातील ‘या’ नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश
ज्येष्ठ साहित्यिक (Senior Literary) समीक्षक नागनाथ कोत्तापल्ले यांचे ७४ वय होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने पाहाल व्यक्त केली जात आहे. अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
“…तर वीजबिलाबाबत मध्यप्रदेश पॅटर्न राबवावा” – देवेंद्र फडणवीस