ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन झाल्याची माहिती खोटी असल्याची त्यांच्या पत्नीने सांगितले आहे. याबाबत बोलताना त्यांची पत्नी म्हणाली, “बुधवारी दुपारी ते कोमात गेले त्यामुळे ते व्हेंटिलेटरवर आहेत. आता याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती माहिती समोर आली आहे.
फ्री स्टाईल मध्ये झिंज्या उपटत मुलींची Boyfriend साठी बेदम मारहाण; पाहा VIDEO
दीनानाथ हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याडगीकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. शिरीष याडीकर म्हणाले, “त्यांच्या तबेटीमध्ये हळु हळु सुधारणा होत आहे. त्यामुळे पुढील ४८ तासात व्हेंटिलेटरची पण गरज भासणार नाही”, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! केंद्र सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
दरम्यान, विक्रम गोखले यांनी अनेक चित्रपट, मालिका आणि नाटक या सर्व व्यासपीठावर काम केले होते. त्यांनी अनेक महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. चित्रपटांबरोबरच त्यांनी नाटकांमध्येही अत्यंत नावाजलेले कलाकार म्हणून ओळखले जाते. मराठी चित्रपटाबरोबर त्यांनी अनेक हिंदी चित्रपट देखील ओळख निर्माण केली आहे.