भोजपुरी चित्रपटसृष्टीतून (Bhojpuri Film Industry) सध्या एक धक्कदायक बातमी समोर अली आहे. भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबे (Akanksha Dubey) हिने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने भोजपुरी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. अभिनेत्रीने वयाच्या २५व्या वर्षी आत्महत्या करत आयुष्य संपवलं आहे.
आनंदाच्या शिध्यावरुन अजित पवारांची सरकारवर जोरदार टिका; म्हणाले…
अभिनेत्री आकांक्षा दुबे हीने आत्महत्या का केली याच कारण अद्याप समोर आलेलं नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार आकांक्षाचा मृतदेह वाराणसीमधील एका हॉटेलमध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. तिने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. यामुळे आता खळबळ उडाली आहे.
खळबळजनक घटना! धावत्या रेल्वेत प्रवाशाला पेटवले
दरम्यान, आकांक्षा दुबे ही प्रसिद्ध अभिनेत्री होती. ही अभिनेत्री दिसायला देखील खूप सुंदर होती. ती तिचे फोटो व व्हिडिओ नेहमी सोशल मीडियावर शेअर करत होती. आकांक्षाचे इंस्टाग्रामवर १.७ मिलियन फॉलोअर्स आहेत. त्यामुळे आकांशाच्या अचानक जाण्याने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
माणसाने चालत्या मेट्रोतून मारली उडी, व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल