
IPL 2024 । अवघ्या काही दिवसांवर आयपीएल (IPL) येऊन ठेपली आहे. आयपीएल ही क्रिकेटप्रेमींसाठी जणू काही एखाद्या उत्सवाप्रमाणे असते. आयपीएलचे सामने पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमी दूरदूरवरून येत असतात. आयपीएलमधील पहिलाच सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore) यांच्यात पार पडणार आहे. संपूर्ण क्रिकेट विश्वाचे या सामन्याकडे लक्ष लागले आहे. (Latest marathi news)
Vasant More । मनसेची साथ सोडताना माध्यमांसमोर ढसाढसा रडले वसंत मोरे; नेमकं काय घडलं?
मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघात मोठा बदल करण्यात आला आहे. क्रिकेटपटू रोहित शर्माकडून (Rohit Sharma) कर्णधारपद काढून घेण्यात आले आहे. त्यामुळे संघाच्या मॅनेजमेंटवर चाहते खूप नाराज झाले आहेत. संघाचे कर्णधारपद हार्दिक पांड्याकडे देण्यात आले आहे. हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) मुंबई इंडियन्स संघामध्ये विंडो ट्रेंडिंगच्या माध्यमातून प्रवेश देण्यात आला असला तरी चाहते कमालीचे नाराज झाले आहेत.
असा आहे मुंबई इंडियन्स संघ
हार्दिक पांड्या (C), रोहित शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, पीयूष चावला, टीम डेव्हिड,सूर्यकुमार यादव, इशान किशन, विष्णू विनोद, अर्जुन तेंडुलकर, शम्स मुलानी, नेहल वढेरा, आकाश मधवाल, नुवान तुषारा, नमन धीर, जेसन बेहरेनडॉर्फ, रोमा, रोहित ब्रेव्हिस, जेराल्ड कोएत्झी, दिलशान मदुशंका, श्रेयस गोपाल, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शिवालिक शर्मा.