रितेश व जेनेलियाचा वेड ( Ved Movie) हा चित्रपट प्रदर्शित होऊन तिसरा आठवडा सुरू झाला आहे. तरीदेखील हा चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने लोकांना इतके वेड लावले आहे की, लवकरच हा चित्रपट 50 कोटींच्या कमाईचा टप्पा गाठणार आहे. दरम्यान या चित्रपटाबाबत अभिनेता व दिग्दर्शक रितेश देशमुख ( Ritesh Deshmukh) याने नुकतीच मोठी घोषणा केली आहे.
अमृता फडणवीस यांनी रिल स्टार रियाजसोबत धरला त्यांच्या नवीन पंजाबी गाण्यावर ठेका; पाहा VIDEO
‘वेड’ या चित्रपटाला लोकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल आभार मानण्यासाठी अभिनेता रितेश देशमुख याने नुकतेच एक इन्स्टाग्राम लाईव्ह केले. यावेळी प्रेक्षकांशी संवाद साधत असताना त्याने मोठी घोषणा केली आहे. शुक्रवार ( दि.20) पासून वेड या चित्रपटाचे नवीन व्हर्जन ( New Version) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही एडिट केलेले नवीन सीन यामध्ये असणार आहेत. तसेच श्रावणी व सत्याचे एक रोमँटिक गाणे देखील या नवीन व्हर्जन मध्ये असणार आहे.
बिग ब्रेकिंग! चालकाचं नियंत्रण सुटल्याने देवदर्शनासाठी निघालेली ट्रॅव्हल्स पलटी; २८ जण जखमी
मूळ वेड चित्रपटाच्या शेवटी असणारे सलमान व रितेशचे गाणे देखील वेडच्या नवीन व्हर्जन मध्ये असणार आहे. दरम्यान प्रेक्षकांच्या आग्रहास्तव चित्रपटात काही बदल करण्यात आले असल्याचे रितेश देशमुख याने सांगितले आहे. याशिवाय महत्त्वाची गोष्ट म्हणजे 20 जानेवारीला ‘सिनेमा लव्हर्स डे’ च्या निमित्ताने हा चित्रपट अवघ्या 99 रुपयांमध्ये पाहता येणार आहे.
ब्रेकिंग! ५०० रुपये दंड आकारून राज ठाकरेंविरोधातील अजामीनपात्र अटक वॉरंट रद्द