Maharashtra Politics । अवघ्या काही दिवसांवर लोकसभा निवडणुका (Loksabha election) येऊन ठेपल्या आहेत. पण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच काँग्रेस पक्षाला (Congress) मोठी गळती लागल्याचे पाहायला मिळत आहे. पक्षातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते पक्षाला रामराम ठोकत आहेत. अशातच आता काँग्रेसला पुन्हा मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. तीन वेळा आमदार राहिलेला बडा नेता करणार भाजपमध्ये (BJP) प्रवेश करण्याची शक्यता आहे. (Latest marathi news)
Maharashtra Politics । दमदाटी करून एकनाथ शिंदेंना अमित शहांनी शांत बसवलं, कोणी केला खळबळजनक दावा?
राजकीय वर्तुळात सध्या काँग्रेसचे तीन वेळा बुलढाण्याच्या खामगाव विधानसभा मतदारसंघातून आमदार राहिलेले दिलीप सानंदा (Dilip Sananda) हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार, अशी चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे दिलीप सानंदा यांनी देखील या चर्चांना दुजोरा दिला असून त्यांनी आपण मुंबईत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेणार असल्याचं सांगितलं आहे.
दरम्यान, मागील अनेक दिवसापासून दिलीप सानंदा भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे. दिलीप सानंदा हे दिवंगत विलासराव देशमुख यांचे अतिशय निकटवर्तीय मानले जात होते. पण देशमुख यांचे निधन झाल्यापासून पक्षात त्यांना दुय्यम वागणूक मिळत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ते राजीनामा देणार असल्याचे बोलले जात आहे.
Ajit Pawar । सुप्रिया सुळे यांच्या डोळ्यात पाणी, व्हिडिओ पाहून काय म्हणाले अजितदादा?