Sharad Pawar | शरद पवारांपुढे मोठे संकट! नरेंद्र मोदींच्या सन्मानाला जाणार की विरोधी पक्षांची एकजूट बळकट करणार?

Big crisis before Sharad Pawar! To honor Narendra Modi or to strengthen the unity of opposition parties?

Sharad Pawar | मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) फुटीनंतर प्रथमच नरेंद्र मोदी आणि शरद पवार एकाच मंचावर दिसणार आहेत. भेटीदरम्यान, या दोघांची काय प्रतिक्रिया असेल? याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (Latest Marathi News)

Accident News । ब्रेक फेल झाल्याने बसचा भीषण अपघात, एका महिलेचा जागीच मृत्यू

तर दुसरीकडे राज्यसभेत 1 किंवा 2 ऑगस्टला दिल्लीचे विधेयक येऊ शकते. याला आम आदमी पक्षाकडून विरोध केला आहे. शरद पवारांनी देखील हजेरी लावून या विधेयकाविरोधात मतदान करावे असे आवाहन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी केले आहे. त्यामुळे आता शरद पवार पुण्यात (Pune) थांबणार की दिल्लीत जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सर्वात मोठी बातमी! लवकरच काँग्रेस पक्ष फुटणार, भाजपच्या बड्या खासदाराचा खळबळजनक दावा

नुकतीच शरद पवार यांनी मुंबईत (Mumbai) एक बैठक घेतली होती. त्यात त्यांनी “आपल्याला भाजपविरोधात (BJP) लढायचे आहे. त्यामुळे आता कोणत्याही परिस्थितीत आपण एकमेकांची साथ सोडायची नाही. देशातील विरोधकांची आघाडी ‘INDIA’ च्या बैठकीचे चांगले नियोजन करा,” अशा सूचना दिल्या आहेत.

Dhanjay Munde : बिग ब्रेकिंग! बोगस खतं विक्री करणाऱ्या कंपनीचा परवाना रद्द; धंनजय मुंडे यांनी दिली माहिती

Spread the love