![Big decision of ST Corporation! Now the passengers will know immediately what is the final location of the bus](http://elokhit.com/wp-content/uploads/2022/10/St-2.jpg)
राज्य परिवहन महामंडळ (State Transport Corporation) प्रवाशांसाठी एक महत्वाची बाब समोर आणत आहे. ही महत्वाची बाब म्हणजे आता राज्य परिवहन महामंडळ ‘व्हेइकल ट्रॅकिंग सिस्टीम’ (Vehicle Tracking System’) यंत्रणा सुरु करणार आहे. या यंत्रणेमुळे आता प्रवाशांना (Passengers) संबंधित एसटीचे करंट लोकेशन (locations) समजण्यास मदत होणार आहे. त्यामुळे आता प्रवाशांना एसटीसाठी (ST) ताटकळत बसावे लागणार नाही. ‘व्हेइकल ट्रॅकिंग सिस्टीम’ यंत्रणामुळे आता प्रवाशांना एसटी कोणत्या भागातून धावतेय, तिचे शेवटचे लोकेशन काय, बसस्थानकावर (Bus Stop) येण्यास तिला किती वेळ लागेल, ही संपूर्ण माहिती मिळणार आहे.
आज मंत्रिमंडळात होणार मोठा निर्णय, पोलिसांसह शासकीय मेगाभरतीसाठी वाढणार वयोमर्यादा
एसटी महामंडळातर्फे आता प्रत्येक आगारांमध्ये डिस्प्ले बोर्ड बसविले जाणार आहेत. हे डिस्प्ले बोर्ड लवकरच कार्यान्वित केले जातील. या डिस्प्ले बोर्डमुळे प्रवाशांना आपली एसटी नेमकी कुठे आहे, याचे लोकेशन समजेल. इतकंच नाही तर एसटीचा अपघात झाल्यास या व्हेइकल ट्रॅकिंग सिस्टीम यंत्रणेमुळे तात्काळ मदतही करता येईल.
जनतेला महागाईपासून मिळाला दिलासा, आता ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त झाला LPG सिलेंडर
दरम्यान येत्या काही दिवसांत एसटी महामंडळ सर्व गाड्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ही ‘व्हीटीएस’ प्रणाली बसविणार आहे.
दरम्यान काही ठिकाणी या स्क्रिनच्या अडचणी आहेत. परंतु येत्या आठ दिवसांत हे ‘लाइव्ह लोकेशन’ प्रणालीचे काम पूर्ण होईल, अशी महत्वाची माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली.